थेंबभर प्रदूषणाच्या मनाईअभावी गंगा घोटभर पाणी पिण्यालायक राहिलेली नाही!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसी आणि कुंभनगरी अलाहाबादमध्येही गंगेचं पाणी पिण्यालायक राहिलेलं नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, संपूर्ण उत्तर प्रदेशात कुठेही गंगेचं पाणी पिण्यालायक राहिलेलं नाही. आणि हा खुलासा सरकारी माहिती अधिकाऱ्यांनीच केलेला आहे. तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी गंगेची स्वच्छता आणि प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांविषयी असमाधान व नाराजी व्यक्त केलीय.......